Published On : Thu, Sep 23rd, 2021

सोनेगाव राजा येथे कामठी तालुका शोध व बचाव पथकास Sdrf मार्फत प्रशिक्षण

मागच्या वर्षी सन 1994 च्या पावसाच्या पुरसदृश्य स्थितीची झाली होती पुनरावृत्ती

कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील आजनी, बीडबिना, सोनेगाव राजा गावाला पुराणे वेढले होते,सोनेगावराजा येथील 350,तर बीडबिना येथील 36 नागरिकांना रेस्क्यू पथकाने बोटी ने सुरक्षित बाहेर काढले होते

कामठी :-मागच्या वर्षी पावसाळ्यात कामठी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने गतवर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडली होती तर सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पेंच प्रकल्पातील पाण्याचा वेढा वाढल्याने नाईलाजास्तव पेंच चे सोळा दरवाजे उघडण्यात आले होते परिणामी हा जलाशय कन्हान नदीत विसर्ग झाल्याने कन्हान नदी फुगल्याने या नदी काठावरील कामठी तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण होत कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बीडबिना, व सोनेगावराजा गावाला पुराणे वेढले होते तसेच दोन्ही गावाना बेटाचे रूप प्राप्त झाले होते

सोनेगावराजा येथे 350 तर बीडबिना येथे 36 नागरिक पुरात अडकले होते दरम्यान एसडीओ श्याम मदणुरकर व तत्कालीन तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या तालुका प्राशासणाचे वतीने त्वरित दखल घेऊन जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने रेस्क्यू ने बोटी ने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश गाठले होते तर यावर्षीसुद्धा मागील काही दिवसांपासून कामठी तालुक्यात सुरू असलेल्या पावसाच्या कहराने नद्या तुडुंब भरून चालल्या आहेत तेव्हा नैसर्गिक आपत्तीचा फटका लागत यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीची पुनरावृत्ती न व्हावी व प्रशासनाची एकच तारांबळ न होता नागरिकांचा जीव मुठीत न यावा यासाठी नियोजित पद्ध्तीने खबरदारी घेण्याच्या पूर्व उपाययोजना म्हणून कामठी तहसील कार्यालय च्या तालुका शोध व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल SDRF मार्फत काल 22 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता सोनेगाव राजा येथे कन्हान नदीवर प्रशिक्षण देण्यात आले.

शासनाकडून नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास रबर बोट प्राप्त झाल्या असून सदर बोटीचा उपयोग तालुका शोध व बचाव पथकास ऐन वेळी नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी कामठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष व तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ काल 22 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता सोनेगाव राजा येथे कन्हान नदीवर तालुका शोध व बचाव पथकातील नायब तहसीलदार माळी, मंडळ अधिकारी महेंद्र कांबळे, तलाठी , युवराज चौधरी आदींना रबराच्या बोटीवर बसवून नदीत प्रशिक्षण देण्यात आले.