Published On : Thu, Sep 23rd, 2021

जिल्हाधिकारी आर विमला यांची कामठी तहसील कार्यलयात आकस्मिक भेट

ई-पीक पाहणी करून शेतकरी आत्मनिर्भर होणार-जिल्हाधिकारी आर विमला


कामठी :-वेळ सकाळी 8 वाजेची होती ….जिल्हाधिकारी आज कामठी तहसील कार्यालयात येणार ….पण केव्हा व किती वाजता येणार याची निश्चिती तहसील प्रशासनाला नव्हती तेव्हा जिल्हाधिकारी मॅडम ह्या केव्हाही येणार असल्याने एसडीओ श्याम मदणुरकर, तहसीलदार अक्षय पोयाम , नायब तहसीलदार माळी, मंडळ अधिकारी, तलाठी आदींनी सकाळी 8 वाजताच तहसील कार्यालयात उपस्थिती दर्शविली होतो योगायोगाने सकाळी 8 वाजताच जिल्हाधिकारी आर विमला यांनी कामठी तहसील कार्यालयाला आकस्मिक भेट दिली .

मात्र सगळे अधिकारी उपस्थिती असल्याने योग्य रित्या शिष्टाचार पाळण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी आर विमला यांनी तहसील कार्यालयाची पाहणी करीत डागडुजी करीत नव्या पद्धतीने सुरू असलेल्या सेतू कार्यलयाची पाहणी करीत तहसीलदार अक्षय पोयाम चे कौतुक केले .नागरिकांना योग्यरीत्या सेवा पुरविण्याचे फर्मान केले . तसेच ई पीक पाहणी करून शेतकरी आत्मनिर्भर होणार असल्याने ई पिक पाहणीवर भर देण्याचे तहसीलदार अक्षय पोयाम ला सुचविले तसेच तालुक्यातील एका गावाला भेट द्यावी या उदार हेतूने नागपूर ला परती च्या मार्गावर असलेल्या खैरी गावात सुद्धा अकस्मात भेट दिली.याप्रसंगी एसडीओ श्याम मदनुरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे, विस्तार अधिकारी मनीष दिघाडे,पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, नायब तहसीलदार माळी, अमोल पौड, युवराज चौधरी यासह पंचायत समिती कार्यालयाचे संबंधित विभाग प्रमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते

जिल्हाधिकारी आर विमला मॅडम यांनी खैरी येथे आकस्मिक भेट दिली असता शेतकऱ्यांच्या शेती च्या पिकांची पाहणी केली तसेच गावात सुरू असलेल्या स्वस्त राशन दुकानात धान्याची पाहणी केली आणि खैरी ग्राम पंचायतला भेट देताच सरपंच बंडू कापसे यांनी जिल्हाधिकारी आर विमला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान सरपंच ,उपसरपंच,सचिव , सदस्य अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्यसेविका यासह गावात 100 टक्के कोरोना लसीकरण झाल्याबद्दल जोल्हाधिकारी मॅडम यांनी सर्व लोकांचे अभिन्नदन केले व पुन्हा मी आपल्या गावाला भेट देणार अशे आश्वासनदिले व आपण आपले गाव सुशोभीत आणि 32 cctv कॅमेरा व डिजिटल स्क्रीन गावात लावलेली आहे असे कार्य प्रत्येक ग्रा.पं. ने केले तर कुठलीच रोगराई होणार नाही व शेतकऱ्यांना पीक विमा काढावा असेही त्यांनी सांगितले.

. दरम्यान गावातील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करतेवेळी जे शेतकरी मोबाईल एप द्वारे स्वता ई पीक पाहणी करणार नाहीत त्यांच्या पिकाची नोंद सात बारा वर होऊ शकणार नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा , शेतातील खरेदी विक्री करणे, , कर्ज माफी, नैसर्गिक आपत्ती , अनुदान वाटप करणे,न्यायालयीन प्रकरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकते तरी कामठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी एप द्वारे आपल्या पिकाची नोंद करावी असे आव्हान जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले.