Published On : Thu, Sep 23rd, 2021

कामठी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल परत आंदोलन

Advertisement

– :-कामठी शहर आणि कामठी ग्रामीण iप्रकल्पातील 71आणि 105 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले मोबाईल परतशासनाने योग्य निर्णय घेतले नाहीतर २४ सप्टेबर रोजी देशव्यापी संप उद्या संविधान चौक नागपूर येथे आंदोलन करणार

कामठी :-शासनाने आँनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत ,या मोबाईची वाँरटी संपलेली असून हँग होणे ,बंद पडणे,डिसप्ले जाणे, आयसे प्रकार घडत आहेत .मोबाईल दुरुस्तीचा भुर्दड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे .या प्रकाराला ञासलेल्या आंगवाडी कर्मचाऱ्यांनी १७ आँगस्ट पासून राज्यभर शासनाला मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला .याची सुचना शासनाला आयटकने फेब्रुवारी महिन्यातच दिली होती .

१६ आँगस्ट पर्यत निर्णय शासनाने घेतले नाही त्यामुळे १७ आँगस्ट पासून मोबाईल परत करण्याला सुरुवात केली असून *आज 23सप्टेंबर बुधवार रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प कामठी शहर आणि कामठी ग्रामीण येथे आयटक कामठी शहर 71 आणि कामठी ग्रामीण 105 येथे अंगणवाडी सेविकाने मोबाईल कार्यालयात जमा केले* बालविकास प्रकल्प कार्यालयात पर्यवेक्षिका यांच्या उपस्थितीत आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष काँ श्यामजी काळे जिल्हा उपाध्यक्ष ज्योती अंडरसहारे कार्याध्यक्ष जयश्री चहांदे यांच्या मार्गदर्शनात
.तालुका अध्यक्ष विशाखा हाडके, आशा पाटील, सचिव विद्या गजभिये, सीमा गजभिये यांच्या नेतृत्वाखाली मोबाईल परत आंदोलन केले यावेळी गट समन्वय यांनी मोबाईल मोजून घेतले .

शासनाने दिलेले सर्व जूने मोबाईल परत घेवून *नविन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे* मोबाईल मध्ये बिघाड झाल्यास दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी.

केंद्र शासनाने जूना काँमन एप्लीकेशन एप्स (कँश) बंद करुन नविन पोषण टँकर एँप्स दिलेला असून तो सदोष आहे .सर्व माहीती इंग्रजी भरावी लागत आहे *महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असल्यामुळे पोषण टँकर एँप्स मराठीत करावे* इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दिलेल्या मोबाईलची वाँरंटी संपली आहे सतत हँग होणे. गरम होणे बंद पडणे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत दुरुस्तीचा येणारा खर्च सेविकांनाच करावा लागत आहे .रँम कमी असल्यामुळे अँप्स डाऊनलोड करण्यासाठी जागाच नाही *केंद्र शासनाने लादलेला पोषण टँकर अँप्स सदोष असून अंगणवाडी सेविकांवर लादला जात आहे.इंग्रजी न येणाऱ्या अनेक सेविकांना त्यात इतरांच्या मदती शिवाय माहीती भरने शक्य होत नाही .वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलने .दैनंदिन करण्याचे काम भरण्याची पध्दत अतिशय किचकट आहे. त्यामुळे उलट तान वाढत आहे तेव्हा कँश अँप्स सारखी पध्दत मराठीत देण्यात यावी .

आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारती नगरकर, शारदा रामटेके, लता घुटके,अनिता बावनकुळे, छाया कडू,मंदा कपाडे,संघमित्रा पाटील यासह आंदोलनात मोठ्या संख्येने सेविका सहभागी होत्या।