Published On : Mon, Jul 8th, 2019

एकाच महिण्यात ३६ लाख तिकीटांची विक्री

जून महिण्यातील दपमरेची आकडेवारी

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकट्या जून महिन्यात ३६ लाख तिकीटांची विक्री करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधांवर विशेष भर दिल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

खिशाला परवडणारा आणि आनंदाचा प्रवास म्हणून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मात्र, अलिकडेच प्रवासी सेवेत स्पर्धा सुरू झाल्यात. त्यामुळे भारतीय रेल्वेने कंबर कसली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. यामुळे प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास वाढत चालला असून प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाºया सुविधांमुळे प्रवासी अधिक प्रमाणात रेल्वेकडे आकर्षित होत आहेत.

नागपूर विभागाला जून महिन्यात तिकीट विक्रीतून २१.२० कोटींचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी जून महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्के अधिक आहे. याशिवाय जून महिन्यातून पार्सल बुकिंगमधून ५० लाख, माल वाहतुकीतून १९.३४ कोटी, खाद्यपदार्थविक्रीतून ६.३९ लाख, जाहिरातीच्या माध्यमतूान ७.५० लाख, पार्किंगमधून ८.९७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

रेल्वेकडे प्रवाशांचा कल वाढत असला तरी गदीर्मुळे फुकट्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. फुकट्यांमुळे अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करणाºयांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन नागपूर विभागात सातत्याने तिकीट तपासणी अभियान राबविले जात आहे. त्यात जून महिन्यात तिकीट न घेता प्रवास करणारे, अनियमित डब्यातून प्रवस करणारे असेच नोंदणीशिवाय मालवाहतूक करण्याचे तब्बल ४६ हजार प्रकरणे उघडकीस आली. त्यांच्याकडून १ कोटी ४४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.