Published On : Mon, Jul 8th, 2019

गोंडेगाव जि प शाळेत वृक्षारोपण

कन्हान : – सामाजिक कार्यकर्ता व उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश,भाजपा ओबीसी मोर्चा तथा माजी सदस्य भारतीय खाद्यनिगम भारत सरकार मा. विजय भाऊ हटवार यांच्या हस्ते गोंडेगाव जि प गोंडेगाव येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊ वितरण करून शाळेच्या पटागणात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी गोंडेगाव सरपंच नितेश राऊत उपसरपंच सुभाष डोकरीमारे, महेंद्र भुरे, बैसाखु जनबंधू, गणेश सरोदे, राहुल टेकाम, अमोल साकोरे, रामदास पहाडे ,अजय जांबुतकर, संजय मेश्राम, चंद्रमणी चिंचखेडे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.