नागपूर– नागपूर शहर वाहतूक विभागातर्फे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये दुपारी १ ते ४ या वेळेत वाहतूक सिग्नल लाल ब्लिंकर मोडमध्ये (Red Blinker Mode – Stop, Watch and then Proceed) कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
नागपूर शहरात सध्या तापमान ४० अंशांच्या वर पोहचले असून त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, जिथे वाहतूक तुलनेत कमी आहे अशा ३३ चौकांमध्ये सिग्नल बदल करण्यात येत आहे. या वेळेत वाहनचालकांनी लाल ब्लिंकर दिवा दिसल्यास थांबावे, चौकात पाहावे आणि मग पुढे जावे, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
यामुळे वाहतूक सिग्नलवर थांबून इंजिन चालू ठेवावे लागणार नाही, ज्यामुळे इंधन आणि ऊर्जेची बचत होईल. तसेच, अनावश्यक थांबा टाळल्याने उष्णतेपासून बचाव होण्यास मदत होईल. या काळात वाहनचालकांनी संबंधित चौकांतून प्रवास करताना ताशी २० किमीपेक्षा जास्त वेग ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘लाल ब्लिंकर मोड’ लागू असलेले प्रमुख ३३ चौक
लोहिया तलाव चौक
जी.पी.ओ चौक
श्रीमोहिते कॉम्प्लेक्स चौक
पोलिस तळाच्या टी पॉइंट
व्ही.आय.पी. चौक
मो. फडके चौक
हिवरी फाटक चौक
राजा राणी चौक
धरमपेठ वाय पॉइंट
अजनी बेकरी चौक
विवेकानंदनगर (हिंदुस्थान कॉलनी) चौक
अहिंसा चौक
अय्यप्पा देवी चौक
टेलिफोन एक्सचेंज चौक
आंबेडकर चौक
कमाल चौक
डी.पी.रोड टी पॉइंट
टी.बी.बॉर्ड चौक
पुष्पकबाजार चौक
निरंकारी टी पॉइंट
माता करी चौक
जयताळा बाजार चौक
खामला चौक
मॅक्स लॅ आऊट चौक
देवनगर चौक
आनंद चौक
गुरुनानक नगर चौक
सक्करदरा चौक
संजय नगर चौक
कडबी चौक
नवम पुलाच्या
इंदोरा चौक
टेलीफोन एक्सचेंज चौक
हे सिग्नल्स “Red Blinker Mode” मध्ये असतील.वाहनचालकांनी या निर्णयाचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर शहर वाहतूक विभागाचे उप आयुक्त अर्चित चांडक यांनी केले आहे.