Published On : Tue, Jan 21st, 2020

रेल्वे स्थानकावरील वाहतूक सुरक्षा व्यवस्था मुकदर्शी?

Advertisement

– सवारीसाठी ऑटोचालकांत जुंपली,सीसीटिव्ही नियंत्रण कक्षातील जवानाला गोंधळ दिसत नाही का?

नागपूर: मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर अलिकडे सवारीवरून ऑटोरिक्षाचालकांत चांगलीच ओढतान सुरू आहे. शुक्रवारी तर ऑटोरिक्षाची तोडफोड करण्यात आली. त्याच वेळी लोहमार्ग वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असती तर… मात्र, येथील पोलिसांना वाहतूकी विषयी काहीच घेणे नाही. आरपीएफ जवानांना तर सीसीटिव्ही नियंत्रण कक्षात अशा प्रकारचा गोंधळच दिसत नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाली. सवारी घेण्यावरून झालेल्या भांडणात वाहतूक सुरक्षा व्यवस्था मूकदर्शी ठरली. असाच प्रकार सुरू राहीला तर पुढे काही खंर नाही.

रेल्वे स्थानकावर खाजगी प्रवासी सुविधा आल्यापासून ऑटोचालकांच्या व्यवसायावर गदा आली. त्यामुळे ऑटोचालक प्रवाशांच्या शोधात असतात. नागपूर स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यांच्या सेवेसाठी येथे प्रीपेड ऑटोरिक्षा केंद्र आहे. रस्त्यावरील ऑटोचालकही स्थानकावर येतात. सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका ऑटोचालकाने प्रवाशाशी बोलनी केली. नियोजित स्थळी सोडून देण्यासाठी सौदा पक्का झाला.

दरम्यान तो ऑटो आणण्यासाठी बाहेर गेला. ऑटो आणल्यानंतर पाहते तर त्या प्रवाशांवर दुसèयानेच हात मारला होता. अर्थात एकाची सवारी दुसèयाने हिसकावली. यावरून त्यांच्यात चांगला वाद झाला. वाद विकोपाला जात असतानाच ऑटोचालकांची गर्दी झाली. चालकांच्या मध्यस्थीनेच वाद सुटला. तत्पूर्वी शुक्रवारी तर यापेक्षा भयंकर वाद झाला होता. ऑटोची तोडफोड आणि पळापळ झाली होती. मात्र, येथील सुरक्षा व्यवस्था मूकदर्शी ठरली आहे.

आरपीएफ ठाण्यात सीसीटिव्ही नियंत्रण कक्ष आहे. याशिवाय बाहेर आणि आत सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. प्रत्येकाची हालचाल नियंत्रण कक्षात असलेला कर्मचारी टिपतो आणि त्यावरून पटनक कारवाईसाठी निघतो. अर्थात सीसीटिव्ही निरीक्षकाच्या आदेशावरूनच कर्मचारी कारवाई करीत असावेत. नियंत्रण कक्षात सर्व काही दिसते. मात्र, ऑटोचालकांचा वाद दिसत नाही का? अशी चर्चा प्रवाशांत होती.

प्रवाशाचा पहिला संबध येतो तो ऑटोचालकाशी नंतर कुली त्यानंतर बाहेरील दुकानदाराशी त्यांनी दिलेल्या वागणुकीवरूनच त्या त्या शहराची प्रतिमा प्रवाशाच्या मनात तयार होते. एकीकडे मध्यरेल्वे प्रशासन रेल्वे स्थानकाची प्रतिमा उंचाविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे सुरक्षा व्यवस्थेची सहकार्य मिळत नसल्याने वादाला तोंड फूटत आहे. हा प्रश्न लोहमार्ग वाहतूक विभागाचा आहे. मात्र, तेही मूकदर्शी ठरत असल्याने वाद पुन्हा पुन्हा उफाळत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी नियमित प्रवाशांनी केली आहे.