Published On : Tue, Jan 21st, 2020

तामिलनाडू एक्स्प्रेसमध्ये दिवसाढवळ्या चोरी

नागपूर: रेल्वेचा प्रवास सुरक्षेचा आणि आनंदाचा समजला जातो. त्यामुळेच प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. मात्र, वाढत्या चोèयांमुळे प्रवाशांचा हा समज चुकीचा ठरत आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास धावत्या रेल्वेत चोरी झाली. नागपुरातील एका अधिकारी तरुणीच्या पर्समधून एक लाख रुपयांचे सामान चोरी गेले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

सीएमपीडीआय, जरीपटका निवासी तेजस्वी बुराला वेकोलीत अधिकारी आहेत. कामानिमित्त त्या विजयवाडा येथे गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर विजयवाडा ते नागपूर असा परतीच्या प्रवासासाठी त्या १२६१५ तामिलनाडू एक्स्प्रेसच्या ए२ डब्यातून २५ क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत होत्या. दरम्यान सोमवारी दुपारच्या सुमारास qहगणघाट जवळ गाडी असताना त्या फ्रेशहोण्यासाठी नुकत्याच गेल्या होत्या. परत आल्यानंतर पाहतात तर त्यांच्या बॅगमधील दोन मोबाईल, एक लॅपटॉप आणि लहान पर्समधून रोख १० हजार याशिवाय महत्वाची कागदपत्रे असा एकून एक लाख १० हजार रुपये qकमतीचा मुद्देमाल होता.
त्यांनी बरीच शोधशोध केली. डब्यातील सहकारी प्रवाशांना विचारपूस केली मात्र, काहीच आढळून आले नाही. नागपुरात गाडी येताच त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू?
एक तरुण रेल्वे रूळावर मृतावस्थेत आढळला. नागपूर विभागातील नरखेड रेल्वे स्थानकावर तो मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तामिलनाडू एक्स्प्रेसमधून पडल्याची सूचना तामिलनाडूच्या गार्डने नरखेड रेल्वे स्थानकाच्या स्टेशन व्यवस्थापकाला दिली. त्यांच्याकडून लोहमार्ग पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पंचनामा केला. मृतक ३० वर्षाचा असावा.

त्याच्या जवळ नागपूर ते पांढुर्णाचे रेल्वे तिकीट मिळाले. मात्र, ते ११ जानेवारीचे तिकीट होते. त्याची अद्यापही ओळख पटली नाही. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मयो रुग्णालयात पार्थिव पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नारायण रेड्डी करीत आहेत.