Published On : Fri, Feb 7th, 2020

उप्पलवाडी पुलाखाली पाईपलाईन फुटल्याने कामठी मार्ग नागपूर मार्गावर वाहतूक ठप्प,

Advertisement

केसीसी कंपनीचा दुर्लक्ष पणा अनेकांनी केली पालकमंत्र्यांकडे तक्रार
नागरिकांना आठ किलोमीटरचा फेरा मारून कामठी ला यावे लागले
कामठी नागपूर मार्गावर दोन्ही बाजूने वाहतुकीच्या लांब रागा

कामठी:- कामठी नागपूर मार्गावर उप्पलवाडी रेल्वे पुलाखाली निर्माण पुलाचे बांधकामा दरम्यान जेसीपी पोकल्याड मशीन लागल्याने नागपूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी मोठी सहा फुटाची पाईपलाईन फुटल्याने उप्पलवाडी पुलाखाली कमर भर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती त्यामुळे मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र शासनाचे वतीने कामठी नागपूर मार्गाच्या चौपदरी सिमेंटी करण्याकरिता शासनाचे वतीने 238 कोटी रुपये 2017 मध्ये मंजूर करण्यात आले होते या कामाचा कंत्रात केसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला असून गेल्या तीन वर्षापासून कंपनीच्या दुर्लक्ष पणामुळे नियम धाब्यावर बसवून बांधकाम होत आहे त्यामुळे नागरिकांना त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे उप्पलवाडी रेल्वे पुलाखाली पुलाचे एका बाजूने अपूर्ण असलेल्या बांधकामाचे खोदकाम सुरू असताना सकाळी नऊ वाजता सुमारास जेसीपी पोकलेन मशीन खोदत असताना कन्हान नदीवरून नागपूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा फुटाच्या पाईपलाईनला भगदाड पडल्याने रेल्वे पुलाखाली कंबरभर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प पडली होती त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या अनेक नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहन पुला खाली पाण्यात टाकले असता वाहन बंद पडून परिस्थिती फार गंभीर निर्माण झाली होती नागरिकांनी लगेच धाव पळ करून वाहनातील प्रवाशांना बाहेर काढून सुरक्षित केले घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना दिली असता पोलीसही घटनास्थळी येऊन दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली त्यामुळे कामठी वरून नागपूर ला जाणाऱ्या मार्ग नागरिकांना खसाळा —कवठा मार्ग उप्पलवाडी पिवळ्या नदीला आठ किलोमीटरचा फेरा मारुन जावे लागले तर काही नागरिकांना याच मार्गाने कामठी ला यावे लागले गेल्या तीन वर्षापासून गेल्या तीन वर्षापासून कंपनीच्या वतीने कामठी नागपूर सिमेंटीकरण याचे बांधकाम होत असून नियम धाब्यावर बसून काम होत असल्यामुळे अनेकदा अपघात घडले असून आतापर्यंत 52 नागरीकांना प्राण गमवावे लागले तर हजारो नागरिकांना अपंगत्व झाले.

कंपनीच्या दुर्लक्षबद्दल नुकतेच कांग्रेस चे इर्शाद शेख,निखिल फलके यांनी कांग्रेस पक्षाच्या वतीने पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांना निवेदन देऊन केसीसी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे कंपनीचे मालक निर्भीड झाल्याचे दिसून येत आहेत अनेकदा या मार्गावर वाहतूक ठप्प झाली की वाहतूक पोलिस व पोलिस प्रशासनाला प्रवाशांच्या भडास ला उत्तर द्यावे लागत असते .नेहमीच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो तरी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी त्वरित दखल घेऊन केसीसी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

बॉक्स:-या उप्पलवाडी वाहतूक पुलावर फुटलेली जलवाहिनी मूळे नागपूर हुन कामठी व कामठी हुन नागपूर कडे दुचाकी तसेच बस ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थीवर्ग तसेच नोकरदार वर्ग कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान विस्कळीत झालेली ही वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी व नागरिकांना सेवा देण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक पोटे, वाहतूक पोलीस कर्मचारी राहुल लोखंडे, माधुरी हातमोडे, हेमंत कुमरे, विजय गवड, यासह आदी कर्मचार्यानी कमरभर पाण्यात खुद्द उभे राहून पाण्यात अडकलेल्या प्रवासांना सुरक्षित बाहेर काढून मोलाची भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठी