Published On : Tue, Aug 11th, 2020

जयताळा बाजार ते राही सभागृहापर्यंतची वाहतूक बंद

मलवाहिनीच्या कामामुळे ३० ऑगस्टपर्यंत वाहतूक प्रतिबंधित

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मलवाहिनी टाकण्याच्या कार्याअंतर्गत जयताळा बाजार चौक ते राही सभागृहापर्यंतची उजव्या बाजुची वाहतूक बंद करण्यात येत आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हिंगणा टि पॉईंट ते रिंग रोड संभाजी चौक पर्यंत मलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कार्याअंतर्गत जयताळा मुख्य मार्गावरील जयताळा बाजार चौक ते राही सभागृहापर्यंत उजव्या बाजूने मलवाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे.

या कार्याकरिता ३० ऑगस्टपर्यंत सदर मार्गावरील उजव्या बाजूची वाहतूक बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक डाव्या बाजूने दुतर्फा रस्त्यांवरून वळविण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता लक्ष्मीनगर झोन क्र.१ यांनी कळविले आहे.