Published On : Tue, Aug 11th, 2020

सकाळी पॉजिटीव्ह, दुपारी नेगेटिव्ह व सायंकाळी घरी परत

कोरोना चाचणीच्या बाबतीत संभ्रम थांबविणे आवश्यक : आ.कृष्णा खोपडे


नागपूर : कोरोना चाचणीच्या बाबतीत खाजगी लॅब व शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या रिपोर्ट येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. खाजगी लॅब व खाजगी रुग्णालयांनी तर आता पैसे कमविण्यासाठी कोरोना रुग्णांनाच टार्गेट केले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शासकीय दवाखान्यात गंभीर रुग्णांचाच उपचार सुरु आहे, त्यामुळे सामान्य लक्षण असलेले कोविड रुग्णांना घरीच उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. एखाद्याचा घरी वेगळी व्यवस्था नसली तर नाईलाजाने त्याला घरीच रहावे लागत आहे किंवा खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.

त्याचाच फायदा घेऊन खाजगी रुग्णालयाने लुटपाट करणे सुरु केले आहे. पी.पी.ई. किटचे एका कीटचे 600 ते 700 प्रमाणे 24 तासात 4 कीटचे पैसे देखील रुग्णांकडून वसूल करण्यात येत असल्याबाबत तक्रारी आहे. बेडचार्ज 9000/- ते 25,000/- पर्यंत, रुग्णालयाच्या खर्चापेक्षा औषधांचा खर्च दुपटीपेक्षा अधिक तर टेस्ट करण्यासाठी लागणारे शुल्क 750 ते 3000 पर्यंत प्रत्येक रुग्णालयात/लॅबमध्ये वेगवेगळे कसे? अनेक रुग्ण सकाळी खाजगी लॅबमध्ये टेस्ट केल्यास पॉजिटीव्ह, शासकीय रुग्णालयात नेगेटीव्ह असल्यामुळे सायंकाळी घरी परत येत आहे. अशी अनेक प्रकरणे या काळात होत आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना घरी न पोचविता रस्त्यातच सोडले जाते. महानगर पालिकेचे डॉक्टर कोविड रुग्णांना घरी राहण्याचा सल्ला देतात, मात्र येऊनही पाहत नाही. व विना टेस्ट केल्यानेच प्रकृती सुधारल्याची माहिती देतात. त्यामुळे महानगरपालिकाचा जणू कोरोन वाढविण्याच्या तयारीत आहे की काय? अशी शंका येते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

5000 बेडचे कोविड सेंटर झाले ध्वस्त, आता पर्यायी व्यवस्था काय?
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म.न.पा. चे माध्यमातून कलमेश्वर रोड वर 5000 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले होत्ते. मिडियाचे माध्यमातून या सेंटरची बरीच चर्चा झाली होती. मात्र मध्यंतरी हे कोविड सेंटर कोणत्याही उपयोगात न येता ध्वस्त झाले. मात्र आता जेव्हा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तेव्हा याबाबत कोणती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे काय? मागील काळात अनेक रुग्णालये येथे रुग्णाची टेस्ट पॉजिटीव्ह आल्यावर हॉस्पिटल सील करण्यात आले होते. मात्र मागील महिन्यात झोन क्रं.8 जवळील एका रुग्णालयात रुग्ण व येथील कर्मचारी देखील पॉजिटीव्ह आले असताना देखील हॉस्पिटल सुरूच कसे? या रुग्णालयावर दया-माया कां? कोरोना रूग्णासंदर्भात शासनाच्या गाईडलाईन्स नागरिकांना कळल्या पाहीजे याकरिता शासनाने वेळोवेळी दिलेली गाईडलाईन सार्वजनिक करावी. अशी देखील मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.