Published On : Tue, Aug 11th, 2020

रेल्वेच्या जागेवर आलमारीचे कारखाने

Advertisement

-नॅरोगेज पुलावर अतिक्रमण,मनपाचा आशिर्वाद – वाहनचालकांची कोंडी

नागपूर– कडबी चौक ते मोमीनपुèयाकडे जाणाèया चौकापर्यंत दुकानदारांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरील नॅरोगेज पुलावरही अतिक्रमण करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाढत्या अतिक्रमणामुळे सकाळ आणि सायंकाळी वाहनांची कोंडी होते. शहरात सर्वत्र अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई होत असताना याच मार्गावर मेहरबानी का? असा प्रश्न वाहनधारक विचारीत आहेत.

या मार्गावर दोन रेल्वे पुल आहेत. एक आरओबी आणि आरयुबी. कडबी चौकाकडून मोमीनपुèयाकडे जाताना प्रथम नॅरोगेजचे रेल्वे ओव्हर ब्रिज लागते. हजार मीटरवर रेल्वे अंडर ब्रिज (आरयुबी) आहे. हा कोलकाता मार्ग आहे. या मार्गाने इतवारी रेल्वे स्थानकावर गाडी जाते. या पुलाखाली अप डाउन असे दोन बोगदे आहे. बोगदे अरुंद असल्याने वाहनधारकांची कोंडी होते. सतत नाल्याचे घाण पाणी वाहन असल्याने एका बोगद्याखाली पाणी साचून असते. आणखीच वाहतूकीची कोंडी होते. तर पुढे म्हणजे कडबी चौक मार्गाने गेल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी लोखंडी आलमारी बनविण्याचे कारखाने आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथे आलमारी तसेच फर्निचर तयार करून विकले जाते. याशिवाय लहान मोठे दुकाने आहेत.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही वर्षांपूर्वी अगदीच लहान स्वरुपात दुकाने होती. कोणाचाही हस्तक्षेप नसल्यामुळे दुकानाचे रुपांतर आता कारखाण्यात झाले आहे. तयार आलमाèया अगदीच रस्त्याच्या बाजुला उभे करून ठेवले जातात. नागपूर दिल्ली मार्गाला लागूनच नागपूर – मोतीबाग रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गाजवळची बहुतेक जागा या कारखानदारांनी काबीज केली आहे. आता व्यवसायाला मोठे स्वरुप आल्याने रहदारीस आणि वाहतूकीला अडथळा निर्माण होता. या मार्गाने मोमीनपुरा, मेयो रुग्णालय, गांधीबाग आणि रेल्वे स्थानकाकडे जाणाèयांची संख्या भरपूर आहे. सकाळ सायंकाळी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आता ही नित्याचीच बाब झाली आहे. मनपाचे अतिक्रमण विभागा आणि रेल्वेलाही याची जाणीव आहे. मात्र, कोणीही कारवाई करीत नाही. यात मात्र, सामान्य वाहनधारकांची कोंडी होते. एकीकडे मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक अतिरिक्त बांधकाम करणाèया दुकानदारांवर करावाई करीत असतानाच दुसरीकडे मेहनबानी का?

राहाटे चौकाजवळही अतिक्रमण
वर्धा मार्गावरील रहाटे चौकाआधी सीताबर्डी पुलाच्याजवळ मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांनी ठिय्या मांडला आहे. याठिकाणी बॅट, रायटिंग टेबलसह, खुर्ची आदी साहित्यांची विक्री केल्या जाते. स्थानिक प्रशासनाद्वारे अनेकदा त्यांना हटविण्यात आले. परंतु, काही तासातच ते पुन्हा तेथेच तळ ठोकून बसतात.

टेबल बाजारात रुपांतर
लाकडी बॅट आणि स्टम्पचा येथे बाजारच लागतो. आधी दुकान नंतर संसारही थाटला. सध्या बॅटची विक्री करणाèया या बाजाराची रायटिंग टेबल बाजार म्हणून ओळख तयार झाली आहे. ग्राहक आपले वाहन रस्त्यावरच उभे करतात. त्यामुळे रस्त्याने जाणाèया वाहनधारकांना आणि पायदळ जाणाèयांना चक्क रस्त्यावरून जावे लागते. आता स्थिती अशी आहे की, अतिक्रमणधारकांना कारवाईची भीती राहिली नाही.

Advertisement
Advertisement
Advertisement