Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Sep 7th, 2019

  नागपूर, पुणे मेट्रोच्या फेसबुक पेजवर एकूण १० लाख फॉलोवर्स

  शासकीय विभागात ‘नागपूर मेट्रो’ एफबी पेज प्रथम क्रमांकावर

  nagpur-metro

  नागपूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतत प्रकल्पाची अद्यावत माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज आज सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. महा मेट्रोतर्फे नागपूर आणि पुणे शहरात राबवित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या फेसबुक पेजवर अनुक्रमे ५.१६ लक्ष आणि ४.९० लक्ष असे एकंदर १०.६ लक्ष फॉलोवर्स फेसबुक’च्या माध्यमातून महा मेट्रोशी जुळले आहेत. तर नागपूर मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज संपूर्ण देशभरातील सर्व शासकीय विभागाच्या फेसबुक पेज’च्या तुलनेत सर्वात ज्यास्त फॉलोवर्स’ची संख्या असणारे पहिल्या क्रमांकावर असणारे पान ठरले आहे.

  महा मेट्रोच्या अखत्यारीत सुरु असलेले नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. आपल्या शहरात सुरु असलेल्या कार्याबद्दलची इंथंभूत माहिती असणे हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे. ह्याच अनुषंगाने दोन्ही शहराची मेट्रो बांधकामाची माहिती पुरवणारे अकाउंट सोशल मीडियावर अत्यंत ऍक्टिव्ह आणि लोकप्रिय ठरत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, वेबसाईट अश्या विविध माध्यमातून मेट्रो बांधकामात होणारी प्रगती लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य हि पानं करीत आहेत. त्यातही मेट्रोचे फेसबुक पान अत्यंत जलद गतीने लाईक्स आणि फॉलोवर्स वाढत जाणारे नागरिकांच्या पसंतीस उतरणारे ठरले आहे. महामेट्रोसाठी १० लाख फोल्लोवॉर्स हि संख्या सतत वाढते आहे.

  मेट्रोच्या फेसबुक पेजवर नागरिकांना सतत प्रकल्पाविषयी अपडेटेड ठेवले जाते. प्रकल्पाचे बांधकाम, स्थानकांच्या स्थापत्य कलेशी संबंधित माहिती, बाह्य-आंतरिक सज्जा, प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक माहिती, वापरण्यात येणाऱ्या यंत्राविषयी माहिती, कार्यादरम्यानचे आकर्षक छायाचित्रे या पानांवर शेअर केली जातात. याशिवाय नागरिकांना जोडून ठेवण्यासाठी वेळोवेळी अनेक ऑनलाईन स्पर्धा, जमिनीस्त्रावरचे उपक्रम देखील आयोजित केल्या जातात. नागरिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असतात. येथे नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची यथोचित उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते हि या पानांची वैशिष्ठ्ये आहेत. ‘लाईक, कमेंट्स व शेयर’च्या माध्यमाने सतत नागरिक या पानावर ऍक्टिव्ह राहतात.

  पुणे आणि नागपूर शहरात मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्णत्वास येत आहे. नागपूर शहरात रिच-१ खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा देखील सुरु झाली असून लवकरच रिच-१ लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज (एक्वा लाईन) दरम्यान प्रवासी सेवा सुरु होणार आहे. मेट्रो सारख्या अती महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कार्य इतक्या वेगाने पूर्ण होणे ही नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे दिवसेंदिवस फेसबुक, ट्वीटर इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया पानावर फॉलोवर्सची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सक्षम मेट्रो सेवा देण्यासाठी महा मेट्रो प्रत्येक स्तरावर आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145