Published On : Sat, Sep 7th, 2019

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५३ लाख ३५ हजार ६०४ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

नागपूर, : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे संकलित करण्यात आलेला 53 लाख 35 हजार 604 रुपयांच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मिहान इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त विक्रम साळे, पोलीस उपायुक्त विवेक मसाळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या कुटूंबांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याची सूचना केली होती. नागपूर शहर पोलीस दलातर्फे जमा केलेल्या वेतनाचा धनादेश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.