Published On : Wed, Jul 3rd, 2019

उद्या कामठी नगर परीषद विरोधी गटाच्या नगरसेवकांचे उपोषण

न प प्रशासना वर पक्षपात करीत असल्याचा आरोप

कामठी : -नगर परिषद पदाधिकारी आणि प्रशासन विकास कार्या बाबत विरोधी पक्षातील भाजपा-बरिएम-शिवसेना च्या नगरसेवकां बाबत पक्षपात करीत असून प्रभागतील विकास कामा बद्दल नागरिकांची ओरड असल्याने विरोधी गटाच्या नगरसेवकांनी उपोषणा चे हत्यार उभारले आहे

उद्या गुरुवारी न प कार्यालय समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा विरोधी पक्ष नेते लालसिंग यादव यांच्या सह इतर नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपविभागीय अधीकारी वंदना सवरंगपते,तहसीलदार अरविंद हिंगे,न प प्रशासन आणि पोलिस विभागाला लेखी पत्रा द्वारे दिला आहे

संदीप कांबळे कामठी