Published On : Wed, Jul 3rd, 2019

ग्रामपंचायत सदस्याची विष प्राषन करून आत्महत्या

कामठी :-रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या पटगोवारी ग्रामपंचायतच्या एका सदस्याने अज्ञात कारणावरून विष प्राषन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून मृतक ग्रामपंचायत सदस्यांचे नाव जीवन काशीराम मेहुणे वय 36 वर्षे रा पटगोवारी ता रामटेक असे आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा मागील वीस वर्षापासून राजकारणात निरंतर प्रगती च्या मार्गावर राहून या कालावधीत ग्रामपंचायत उपसरपंच पद सुद्धा भूषविले तर तिसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते मात्र अज्ञात कारणावरून मृतकाने आपल्या राहत्या घरातील खोलीत 30 जून ला रात्री साडे दहा वाजता विषारी औषध प्राषन केले असता घरमंडळींनि त्वरित

कामठी येथील आशा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले मात्र उपचारादरम्यान आज 4 जुलै ला पहाटे 4 वाजता मृत्यू झाला असून नवीन कामठी पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे मात्र आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठीमागे आई,पत्नी व 2 लहान मुले असा आप्तपरिवार आहे.

संदीप कांबळे कामठी