Published On : Tue, Aug 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात टोमॅटोचे भाव पुन्हा वाढले ; तब्बल २०० रुपये प्रतिकिलो विक्री

Advertisement

नागपूर : शहरात पुन्हा टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर २०० रुपये प्रतिकिलो इतके झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे भाव वाढल्याने टोमॅटो घेणार्‍या ग्राहकांची संख्या रोडावली आहे. भाज्यांचे भाव पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कडाडल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

दरम्यान टोमॅटो हा रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, 200 रुपयांत पूर्ण बाजार होण्याऐवजी आता केवळ टोमॅटोच 200 रुपये दराने घ्यावा लागत आहे. पावसाळा सुरू होताच शेतीच्या हंगामाला सुरुवात होते.

Gold Rate
Feb 11th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,500/-
Gold 22 KT ₹ 1,46,500 /-
Silver/Kg ₹ 2,63,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या काळात भाजीपाल्याचे पीक घेण्याऐवजी हंगामी पीक घेण्यावर शेतकर्‍यांचा भर असतो. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक अत्यंत कमी होते आणि किंमतीत वाढ होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement