Published On : Tue, Aug 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील पाच बास्केटबॉलपटूंची सब-ज्युनियर नॅशनलसाठी निवड

Advertisement

नागपूर: पुद्दुचेरी येथे ३ ते ९ ऑगस्ट दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सब-ज्युनियर (अंडर-१३) राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या ४८व्या आवृत्तीत नागपुरातील पाच बास्केटबॉलपटूची निवड करण्यात आली आहे. बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) द्वारे मुले आणि मुलींसाठी सब-ज्युनियर (U-13) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाते. ओम राऊत, सर्वेश कवीश्‍वर, अनिरुद्ध मुंधडा आणि उर्जित देवगडे आणि एक मुलगी निहारिका देवघरे हे महाराष्ट्राच्या मुला-मुली संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

पुणे येथे नुकत्याच झालेल्या सब-ज्युनियर राज्य बास्केटबॉल स्पर्धेत नागपूरच्या मुलांचा संघ चॅम्पियन ठरला तर मुलींचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. त्यानंतर बास्केटबॉल संघटनेने महाराष्ट्रातील संभाव्य खेळाडूंसाठी तयारी शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर पुणे येथे झाले. तयारी शिबिरानंतर नागपूरचे पाचही खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले.

Gold Rate
12 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,30,300 /-
Gold 22 KT ₹ 1,21,100 /-
Silver/Kg ₹ 1,92,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

12 सदस्यीय महाराष्ट्र संघात निवडलेल्या चार मुलांपैकी ओम राऊत हा धरमपेठ क्रीडा मंडळ (DKM) येथे सराव करतो, सर्वेश कवीश्‍वर नागपूर हौशी क्रीडा संघटनेचा (NASA), अनिरुद्ध मुंधडा हा शिवाजी नगर जिमखाना (SNG) येथे सराव करतो. आणि उर्जित देवगडे अपोलो बास्केटबॉल क्लब (ABC) चा सदस्य आहे. निहारिका देवघरे स्पार्टन बास्केटबॉल क्लबची सदस्य असून प्रणय भगतने तिला प्रशिक्षण दिले आहे.

नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे (एनडीबीए) अध्यक्ष संदिप जोशी, सचिव भावेश कुचनवार आणि एनडीबीएच्या सर्व सदस्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement