Published On : Mon, Mar 1st, 2021

आज 44 नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

कामठी :-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सर्वत्र सुरुवात झाली असून आज 1 मार्च पासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षावरील दुर्धर आजाराचे रुग्ण यांना लस देण्याचे शासनाच्या निर्णया नुसार आज कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 44 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली .

एकीकडे कोरोना डोके वर काढून रोद्र रूप धारण करण्याच्या बेतात आहे मात्र शासनाकडून आज 1मार्च पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची सोय सर्वसामान्यांसाठी नियोजित केले असून सद्यस्थितीत ही लस कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येत आहे तर या सरकारी रुग्णालय सोबत खासगीतही ही लस घेता येणार असल्याची माहिती आहे .

संदीप कांबळे कामठी