Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Mar 1st, 2021

  MG मोटर इंडिया आणि MG नागपुर डीलरशिप यांनी नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या

  नागपुर: MG SEWA उपक्रमाच्या अंतर्गत MG मोटर इंडियाने नागपुरच्या नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलला पाच रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या. नागपुरमध्ये COVID-19 च्या केसेस पुन्हा वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत ह्या अॅम्ब्युलन्समुळे सामान्य जनतेला उत्तम अॅम्ब्युलनसग सेवा मिळू शकले. नांगिया हॉस्पिटल आणि MG मोटर यांनी या दुसर्‍या लाटेत पुढे येऊन लोकांसाठी अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली आहे. ही अॅम्ब्युलन्स सेवा खास करून नागपुरमध्ये राहणार्‍या COVID-19 रुग्णांनाच देण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री. नितिन गडकरी यांनी या सेवेचे उद्घाटन करून या शहरातील हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भर घातली.

  या हेक्टर अॅम्ब्युलन्स MG च्या इंजिनियर्सनी त्याच्या हालोल येथील प्लांटमध्ये विशेष गरजा पुरवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. पाच-निकषांच्या मॉनिटरसह औषधांचे कपाट, एक ऑटो लोडिंग स्ट्रेचर, व्हेंटिलेटर, एक ऑक्सीजन सप्लाय सिस्टम, अतिरिक्त सॉकेट्स सह एक पर्यायी पॉवर बॅकअप (इन्व्हर्टर), सायरन, एक लाइटबार आणि फायर एक्स्टिंग्विशर यांनी त्या सुसज्ज आहेत. MG ने यापूर्वी वडोदरा येथील GMERS हॉस्पिटल आणि हालोल येथील CHC हॉस्पिटल यांना हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या आहेत.

  सदर उपक्रमाबद्दल बोलताना MG मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “आम्हाला वडोदरा येथील GMERS हॉस्पिटल आणि हालोल येथील CHC हॉस्पिटलकडून हेक्टर अॅम्ब्युलन्सबद्दल सकारात्मक फीडबॅक मिळाला आहे.

  या अॅम्ब्युलन्समुळे या महामारीविरुद्धच्या लढ्यात त्यांची मूर्त मालमत्तेची क्षमता वाढली आहे. MG SEWA उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही समाजातील गरजा पूर्ण करण्याबाबत अत्यंत समर्पित आहोत कारण तो MG चा एक आधारस्तंभ आहे. आता आम्ही हालोल आणि वडोदराच्या पुढे जाऊन आणखी पाच हेक्टर अॅम्ब्युलन्स दान करत आहोत. आमचा विश्वास आहे की, काळाच्या गरजेनुसार समाजाची सेवा करण्यात हेक्टर अॅम्ब्युलन्स यापुढेही अशीच मदतरूप होत राहील.”

  अति जलद, अत्यंत विश्वसनीय आणि टेक-सॅव्ही अॅम्ब्युलन्स सेवा पुरवून नांगिया हॉस्पिटल नागपुरच्या जनतेला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीची उत्कृष्ट सेवा देत आहे.

  MG नागपुर डीलरशिपचे डीलर प्रमुख महेश नांगिया म्हणाले, “ही सेवा आमचे हॉस्पिटल अमेरिकन ओंकोलोजी इंस्टीट्यूट नागिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलच्या छत्राखाली आणि रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांच्या सहयोगाने राबवली जाईल. रुबी हॉलने नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस, यूके अंतर्गत उत्कृष्ट अॅम्ब्युलन्स सेवा प्रदान करण्यासाठी वेस्ट मिडलँड इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसशी भागीदारी केली आहे. गोल्डन अवर आणि प्लॅटिनम मिनिट्स या महत्त्वाच्या कालावधीत रुग्णाचा जीव वाचविण्याची वचनबद्धता त्या मागे आहे. आमचे ध्येय आहे, महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात फूल ना फुलाची पाकळी इतकी मदत म्हणून, नागपुरच्या सर्वसामान्य माणसाला जलद आणि विश्वसनीय अॅम्ब्युलन्स सेवा प्रदान करणे.”

  नागपुरमध्ये राहणारी कोणतीही व्यक्ती 8988897888 वर कॉल करून COVID-19 रुग्णासाठी या अॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ घेऊ शकते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145