कामठी:-कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले असताना यावर प्रतीबंधात्मक उपाय म्हणून कोरोना लसिकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे दरम्यान कामठी तालुक्यातील शहरी भागात आतापर्यंत 1495 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली असून लसिकरणाचा पहिला टीका लावून घेण्याचा पहिला मान तालुका आरोग्य अधिकारी डॉ माने यांना मिळाला आहे.
कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 26 जानेवारी पासून सुरुवात करण्यात आलेल्या लसिकरणाचा लाभ सर्वप्रथम कोरोना योद्धना देण्यात आला यात आरोग्य विभागात कार्यरत अधिकारी , कर्मचारी, आशा , अंगणवाडी सेविका, मदतनीस , महसूल विभाग, पंचायत समिती अधिकारो कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचारो , शिक्षण विभाग, खाजगी वैद्यकिय डॉक्टर व त्यांचे कर्मचारी यांचा समावेश आहे.
पहिल्या टीका करणा नंतर दुसरा टीका लावणे अत्यावश्यक करण्यात आले असून लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन करण्यात आली आहे तर दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी उचित काळजी घेण्यासोबतच तोंडावर मास्क चा वापर करणे ,वारंवार साबणाने अथवा सॅनिटाइझर ने हात स्वच्छ करणे,यासह सार्वजनिक ठिकाणी वावरताना सामाजिक दुरीकरणाचे नियम पाळणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, लक्षणे दिसू लागताच तात्काळ नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घेणेच हिताचे ठरणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ माने यांनी दिली आहे
संदीप कांबळे कामठी