Published On : Fri, Oct 16th, 2020

भंडारा जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी नगरपालिका आणि पंचायतीमधील रिक्त पदे तातडीने भरावीत

Advertisement

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीमधील विकास कामांना गती मिळावी यासाठी रिक्त पदे पदोन्नती, बदली, प्रतिनियुक्ती अथवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती अशा माध्यमातून तातडीने भरण्यात यावी. असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी दिले.

विधानभवन येथे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, लाखनी, साकोली आणि मोहाडी या नगरपालिका आणि पंचायतीमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, सहसचिव पांडूरंग जाधव, उपसचिव कल्पिता पिंपळे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नगरपंचायतीमधील अभियांत्रीकी पदे रिक्त असल्याने विकास कामे पूर्ण करण्यास विलंब होत आहे. संबंधित विकासकामांना गती मिळावी यासाठी अभियांत्रीकी पदे व लेखा शाखेतील पदे पदोन्नती, इतर जिल्ह्यातील बदली, प्रतिनियुक्ती अथवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शासकीय नियमानुसार करार पद्धतीने सेवेत घेण्याची कारवाई करून तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.