Published On : Wed, Mar 18th, 2020

रामटेक तालुक्यात व ग्रामीण भागात या व्हायरस चे संक्रमण टाळण्यासाठी संबंधित प्रशासनातर्फे

Advertisement

कोणत्या उपाययोजना आखल्या *ग्रामीण भागात याबाबत जनजागृतीची गरज जागरुक नागरिक यांचा सवाल

रामटेक: राज्यावर कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या व्हायरस चे संक्रमन टाळण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे. मात्र रामटेक तालुक्यात व ग्रामीण भागात या व्हायरस चे संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनातर्फे कोणत्या उपाययोजना आखल्या ते दिसून येत नाही आहे.

सद्ध्या वातावरणात बदल झाल्याने तालुक्यात खोकला, ताप, आणि सर्दी असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

कधी ढगाळ तर कधी ऊन, तर कधी रात्री थंडी, असे वातावरण सुरू आहे. एखादा रुग्णाला सर्दी ताप यासारखी लक्षणे दिसताच कोरोनाची साथ होणार नाही याकरिता जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना सांगितल्या जात आहे. या उपाययोजनेची विचार फक्त मोठ्या शहरात सुरू आहे ग्रामीण भागात याबाबत अध्यपाही जनजागृती दिसत नाही आहे . विभाग ,आरोग्य विभाग, पंचायत समिती नगरपालिका व इतर विभागणी एकत्र येऊन कोरोना व्हायरस चे संक्रमण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात होऊ नये म्हणून नागरिकांनी काय करावे काळजी कशी घ्यावी .

याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे मात्र अजूनही प्रशासन तर्फे कोणतीही माहिती दिली नसल्याचे दिसून येते तालुका स्तरावर तहसीलदार ,तालुका आरोग्य अधिकारी, अधिक्षक ग्रामीण रुग्णालय , मुख्याधिकारी खंडविकास अधिकारी,हे महत्त्वाचे घटक आहेत. कोरोना व्हायरस चे संक्रमण टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत तालुक्यात वरिष्ठ पातळीवर साधी बैठक सुद्धा नाही झाली आहे . रामटेक तालुक्यात पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे मुंबई ,पुणे, कर्नाटक , बंगलोर,गुजरात, दिल्ली भोपाळ सारख्या ठिकाणी य येथील कंपनीतील कर्मचारी येणे जाणे करत आहेत त्यामुळे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.. वैदकिय अधिकारी उजगरे यानि सांगितले की रामटेक मध्ये एकही रुग्ण नाही आहे की ज्याला कोरोना रोग आहे. तरी आम्ही पूर्ण तयारी केली आहे ऐकून ८ बेड चे ॲसुलेशन वॉर्ड आम्ही तयार ठेवले आहे जेणेकरून कोणी कोरोना चे पेशंट आले तर त्यांना तत्काळ वॉर्ड मध्ये दाखल करण्यात येईल..आणि जर नागपूर मेयो मधे न्यायची गरज पडली तर गाडी ची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

“सरकारी दवाखान्यात कोरोना चे एकही रुग्ण नाही असे सांगितले। मुख्यधिकारी स्वरूप खरगे यांनी सांगितले कीआम्ही कोरोना साथ बाबत उपाय योजना करत आहोत” कोरोना बाबत जनजागृती करने सुरु असल्याचे आमचे प्रतिंनीधी सोबत बोलताना सांगितले