Published On : Wed, Mar 18th, 2020

पुस्तक दान संस्कृतीचा प्रचार झाला पाहिजे — श्री मिलिंद वानखेडे

सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दान सोहळा


कन्हान : – वाचन संस्कृती वाढविण्या साठी तसेच नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी पुस्तक देवाणघेवाण व पुस्तक दान संस्कृतीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, असे मत शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी व्यक्त केले.

कन्हान येथील सार्वजनिक वाचना लयात (दि१८) ला खिमेश बढिये यांच्या तर्फे आयोजित पुस्तक दान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पुस्तक दान चळवळीचे प्रमुख खिमेश बढिये, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोतीराम रहाटे, पत्रकार संघाचे पदाधिकारी कमल सिंह यादव, धनंजय कापसीकर, सार्वज निक वाचनालयाचे अध्यक्ष वासुदेवराव चिकटे, सचिव मनोहरराव कोल्हे, कोषा ध्यक्ष दिनकरराव मस्के, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी सौ प्रणाली रंगारी, भिमराव शिंदेमेश्राम, मुख्याध्याप क राजेंद्र खंडाईत, राजू हारगुडे, गणेश खोब्रागडे उपस्थित होते. पुस्तक दान संस्कृती विषयी बोलताना श्री बढिये यांनी ज्ञान मिळविण्यासाठी व्यापक प्रयत्न केला पाहिजे.असे करत असतांना आपल्याजवळील वाचून झालेली पुस्तके दुसर्‍या गरजू व्यक्तींच्या कामात आली पाहिजे या दुष्टीने पुस्तक दान संस्कृती जोपासली पाहिजे, असे मत व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष वासुदे व चिकटे यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विषद करुन पुस्तक दान उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर प्रास्ताविक मोतीराम रहाटे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गणेश खोब्रागडे यांनी मानले.