नवी दिल्ली: मुल जन्माला घालण्यासाठी तिचे लग्न होणे आवश्यक नसल्याचे भन्नाट वक्तव्य चित्रपट अभिनेत्री शमा सिकंदर हिने केले. शमा ने 2 वर्षापूर्वी अमेरिकी व्यापारी जेम्स मिलिरॉन याचेशी साखरपुडा केला होता. तव्हापासून तिच्या लग्नाच्या बातम्या येत आहे. तेव्हापासून तिला प्रश्न विचारले जात आहे. जेव्हाकि 24 महिने झाल्यानंतरसुद्धा शमाने आपल्या लग्नाचा खास प्लान केला नाही. ती म्हणाली कि आम्ही लग्नाबाबत प्लान करत असतो मात्र काहीही ठरवू शकत नाही.
शमा म्हणाली, आम्हाला आधीसुद्धा असेच जाणवत होते कि आमचे लग्न झालेले आहे. आम्ही आयुष्याला एका पार्टीच्याप्रमाणे एंजॉय करतो. आमचे लग्न कुठल्या एका मोठ्या पार्टी प्रमाणे होईल ज्यामध्ये आमचे नातेवाईक सहभागी होतील. ती म्हणाली कि, मला असे जाणवते कि एक दिवस मी सुट्ट्या घालवायला जाईल आणि अचानक सर्वांना लग्नाची बातमी देऊन आश्चर्यचकित करेल. शमाच्या नुसार तिला असे करने आवडेल कारण मोठ्या संख्येंने लोकांना बोलावणे पसंत नाही.
खुलेपणाने आयुष्यावर बोलणारी शमा म्हणाली मला मुले जन्माला घालण्यासाठी लग्नाची गरज नाही. लग्नाच्या बाबतीत ती म्हणाली, ती आपल्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच बोलावेल.
