Published On : Wed, Jun 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील सीताबर्डी फ्लायओव्हरवरील हाइट बॅरिअरला धडकला टिप्पर; २४ तासात दुसरा अपघात

Advertisement

नागपूर : शहरातील सीताबर्डी परिसरातील शहीद गोवारी फ्लायओव्हरवरील हाइट बॅरिअरला सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या वाहनाने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (५ जून) एका टिप्परने फ्लायओव्हरच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हाइट बॅरिअरला

जोरदार धडक दिली.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेला अवघा एक दिवस उलटलेला असतानाच मंगळवारी (४ जून) एका फ्युएल टँकरने हाच बॅरिअर तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या टँकरमध्ये २३,००० लिटर पेट्रोल होते. त्या घटनेनंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे बुधवारी पुन्हा एक अपघात घडला आहे.

वाहतूक काही काळ विस्कळीत-
बुधवारीच्या अपघातामुळे फ्लायओव्हरवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, ट्राफिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून टिप्पर हटवला आणि वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

अपघातास कारणीभूत असलेली कारणं-
हा अपघात साइन बोर्ड योग्य ठिकाणी नसल्यामुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या वाहनचालकांना फ्लायओव्हरवर हाइट लिमिट आहे, हे वेळेवर समजत नाही. परिणामी, ते चुकीने फ्लायओव्हरवर चढतात आणि अशा अपघातांना सामोरे जावे लागते.स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांकडून मागणी करण्यात येत आहे की, ट्राफिक पोलिसांनी यासंदर्भात जागरूकता वाढवावी. योग्य ठिकाणी स्पष्ट, रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड, GPS मार्गदर्शनामध्ये सुधारणा आणि फ्लायओव्हरच्या प्रवेशद्वारावर अडथळा रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Advertisement
Advertisement