Published On : Wed, Aug 11th, 2021
By Nagpur Today Nagpur News

आतापर्यंत सुमारे ५०० पथविक्रेत्यांनी केली नोंदणी

Advertisement

पथविक्रेत्यांच्या योजनांसंदर्भात १३ ऑगस्टपर्यंत शिबिर

नागपूर : पथविक्रेत्यांकरिता उत्थानाकरिता केंद्र शासनाद्वारे असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आतापर्यंत सुमारे ५०० पथविक्रेत्यांनी नोंदणी केली आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सीताबर्डी येथील टेम्पल बाजार मार्गावरील स्व.पंडीत रवीशंकर शुक्ल हायस्कूल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट रोजी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त (समाज विकास विभाग) राजेश भगत, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर, शहर अभियान व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, प्रमोद खोब्रागडे, रितेश बांते, नूतन मोरे आदी उपस्थित होते.

१३ ऑगस्टपर्यंत शिबिर असून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत पथविक्रेत्यांना शिबिरामध्ये सहभागी होता येईल. यासाठी त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो, इलेक्ट्रिक बिल, अनुसूचित जाती व जमाती असल्यास जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.

केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम स्वनिधी) अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पथविक्रेत्यांना कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाउन काळात झालेल्या नुकसानामुळे पुनश्चः व्यवसाय करण्याकरिता १० हजार रुपये भांडवल कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या पथविक्रेत्यांना १० हजार रुपये कर्ज बँकेमार्फत वितरीत करण्यात आले आहे, अशा पथविक्रेत्यांकरिता सदर योजनेशी संलग्नित करण्याकरिता केंद्रशासनामार्फत स्वनिधी ते समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत वित्तीय विभागामार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि इन्शुरन्स ऑफ रूपे कार्ड, कामगार विभागामार्फत बांधकाम मजूर नोंदणी प्रक्रिया, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अन्न व औषध पुरवठाविभागामार्फत ‘एक देश एक रेशन कार्ड’, आरोग्य व परिवार कल्याण विभागामार्फत जननी सुरक्षा योजना, महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना आदी योजना असून या योजनांचा लाभ घेण्याबाबत पथविक्रेत्यांना शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे. शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजविकास विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement