Published On : Tue, Mar 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त; ५७ जणांवर तात्पुरते हद्दपार आदेश!

Advertisement

नागपूर : रामनवमी सण शांततापूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी नागपूर पोलीस प्रशासनाने कठोर प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. परिमंडळ क्र. ०३ अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) अन्वये ५७ संशयित गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तात्पुरते हद्दपार आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींना नोटीस बजावून त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार, संबंधित इसमांना २४ मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Gold Rate
Mar 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,39 ,500 /-
Gold 22 KT ₹ 1,29,700 /-
Silver/Kg ₹ 2,21,400/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.पोलीस ठाणेनिहाय कारवाईत गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत ४० तर तहसील पोलीस ठाणे हद्दीत १७ अशा एकूण ५७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी आणि अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक) राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, परिमंडळ क्र. ०३ चे पोलीस उपआयुक्त राहुल मदने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. रामनवमी सण सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement