Published On : Thu, Jul 1st, 2021

गुरुवारी २२ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. १ जुलै ) रोजी २२ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,४३,००० चा दंड वसूल केला. पथकाने ८३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. गांधीबाग झोन सहा.

आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे कोव्हिड – १९ चे आदेशाचे उल्लंघन करणा-या गांधीबाग झोन अंतर्गत एकूण २ दुकाने सील करण्यात आली. यामध्ये नगमा फॅशन सेंटर मोमीनपुरा व अमीत आईस्क्रीम पार्लर सिटी पोस्ट ऑफीस, गांधीबाग या दुकानाचा समावेश आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.