Published On : Sat, Jul 6th, 2019

गळती दुरुस्तीसाठी २४ तासांचे कन्हान जलशुद्धीकरण केंद्र शटडाऊन ९ जुलै रोजी

नेहरू नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन व आशी नगर झोनचा पाणीपुरवठा राहणार बाधित…
शटडाऊन दरम्यान आणि नंतर बाधित भागांना टँकर ने पाणी पुरवठा शक्य नाही

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केन्द्र येथे ९ जुलै सकाळी १० ते १० जुलै सकाळी १० दरम्यान २४ तासांचे पंपिंग शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शटडाऊन दरम्यान कन्हान केंद्राच्या १३००/९०० मिमी व्यासाच्या वाहिनीवर ऑटोमोटिव्ह चौक रिंग रोडवर कळमना दिशेला उद्भवलेल्या गळतीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच बिनाकी बस्तरवारी जलकुम्भांना पाणीपुरवठा करणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या वाहिनीवरील ९००मिमी व्यासाच्या जुन्या स्लुईस व्हॉल्वच्या जागी नवीन ९००मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व ऑटोमोटिव्ह चौक येथे लावण्यात येणार आहे.

या शटडाऊनमुळे संपूर्ण नेहरू नगर झोन, लकडगंज झोन व आशी नगर झोनचा पाणी पुरवठा बाधित राहील तर बोरियापुरा फीडर मेन व बोरियापुरा जलकुंभ सोडून उर्वरित सतरंजीपुरा झोनचा देखील पाणीपुरवठा बाधित राहील.

यासह बिनाकी जलकुंभ, इंदोरा जलकुंभ १ व २ यावरून पुरवठा होणारे तसेच उप्पाल्वादी-वांजरा भागातील पाणीपुरवठा बाधित राहील. पाणीपुरवठा बाधित राहणाऱ्या एकूण भागांची यादी सोबत दिलेली आहे.

मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement