Published On : Sat, Jul 6th, 2019

रामटेक पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव 10 जुलाई ला

Advertisement

रामटेक: पोलीस स्टेशन रामटेक येथे बऱ्याच कालावधी पासून .पोलीस स्टेशन रामटेकच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून एकूण 44 दुचाकी बेवारस वाहने लावारीस स्थितीस पडली असून त्यांची विल्हेवाट लावण्यामधे पोलीस स्टेशन चा बराच भाग अडकून पडला आहे .याची लगेच गाम्भिर्य लक्षात घेऊन नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे आदेशान्वये उपविभागीय अधिकारी नयन आलूरकर , तहसीलदार रामटेक यांचे प्रमुख उपस्थितीत जाहीर लिलावाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले .

ही वाहने ज्यांची आहेत त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क साधून व कागदपत्रे सादर करून वाहने घेऊन जावीत आणि जी वाहने नेली जाणार नाहीत त्या गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. सदर दुचाकी गाड्यांचा लिलाव दिनांक 10 जुलै बुधवारला होणार असून वाहनांच्या अटी व शर्तीवर जाहीर लिलाव होणार आहे. लिलावाची प्रक्रिया पोलीस स्टेशन रामटेक येथे सकाळी 11 वाजता सुरू होणार असून सदर वाहन खरेदी करायचे असतील तर त्यानी रामटेक पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहावे . असे आवाहन पोलीस स्टेशन रामटेक चे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले आहे .

सदरचे वाहनाबाबत ज्या कोणालाही हरकत असेल किवा सदरची वाहने ज्यांची कुणाची असतील त्यांनी वाहनांचे कागदपत्रा सह पोलीस स्टेशन ला हजर राहून सदरची वाहने ही त्यांचे मालकीची असल्याबाबत खात्री पटऊन द्यावी .असे आवाहन पोलीस स्टेशन रामटेक चे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले आहे .