Published On : Sat, Jul 6th, 2019

नोटबुक व सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा केला गौरव

रामटेक : रामटेक येथे नुकताच नोटबुक व सन्मान चिन्ह देऊन गुणवंत व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा गौरव सत्कार महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा चे उपाध्यक्ष विजय हटवार व माजी सदस्य भारतीय खाद्य निगम भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला . आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना विजय हटवार म्हणाले की विद्यार्थ्याचा गौरव सत्कार केल्याने त्यांचे मनोबल उंचावते त्यांची प्रगती होते .

गरजू विद्यार्थी करीता स्कॉलरशिप ची सोय ,त्यांच्या शिक्षणाची सोयी करीता सदैव मदत करीत असल्याचे सांगून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता शासनाच्या शिक्षणासंबंधी विविध योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहचवित असल्याचे प्रतिपादन ह्याप्रसंगी केले . संताजी सेना व बेटी बचाव बेटी पडावं या संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या सम्प्पन झाला .ह्यावेळी विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार करण्यात आला ह्यावेळी विद्यार्थ्यांना नोटबुक व सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले .

७० विद्यार्थी खेळाडू व ८९ विद्यार्थी १०वा वर्ग व १२ वी विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नरेन्द्र भरडकर रामटेक नगर परिषद अध्यक्ष दिलीप देशमुख सामाजिक कार्यकर्ता व उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व्यसन मुक्ती गौरव पूरस्क्रूत लक्ष्मण मेहर बाबुजी ,नगर परिषदचे गट नेते अलोक मानकर व श्रीराम शाळेचे मुख्याध्यापक आकट सर अँड . सुर्यभान हटवार, हेमराज सावरकर,समाजसेवक गोपी कोलेपरा व सौ. ज्योती कोलेपरा , संताजी सेनेचे अध्यक्ष नाना उराडे, अजय खेडगरकर , प्रविण कारेमोरे ,बाबदेव व विद्यार्थ्यांना ठाकूर पोलिस निरीक्षक यांनी यांनी विद्यार्थ्यांना व आई वडिलांना मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना समोरच्या शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन अजय खेडकर यांनी केले तर आभार नाना उराडे यांनी मानले .