Published On : Sun, Jun 10th, 2018

Video: शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई – जोधपूर एक्सप्रेस खाली चिरडून तीन महिलांचा मृत्यू

Advertisement

शेगाव: : चेन्नई – जोधपूर एक्सप्रेस खाली चिरडून तीन प्रवाशी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 11. 30 वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर घडली. अपघातातील महिला नांदुरा येथील रहिवाशी असल्याचे समजते. आजचा रविवार असल्याने शेगाव येथे दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होते. आजूबाजूच्या परिसरातील महिला, पुरुष भाविक श्री. संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे येतात.

बहुतांश भाविक रेल्वे ने येतात. आज पुरुषोत्तम (अधिक) महिन्यातील एकादशी आहे. अधिक महिन्यातील रविवारी येणारी एकदशी पवित्र मानण्यात येते. त्यामुळे प्रामुख्याने रविवारी गर्दी राहते. दर्शनासाठी आलेल्या चार महिला अशाच रेल्वेस्थानकावर थांबल्या होत्या.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भुसावळ पॅसेंजर मध्ये चढन्याच्या प्रयत्नात त्यांना चेन्नई एक्सप्रेस दिसला नाही. सरिता विजय साबे वय ३0 रा. स्टेट बँकांच्या मागे नांदुरा,संगीता भानुदास गोळे वय 40 रा अलमपूर ता नांदुरा, चंदाबाई शिवहरी तिसरे वय ४५ रा अलमपूर ता नांदुरा यांचे सह एक महिला गाडी खाली आल्या, या अपघातात उपरोक्त तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

त्यांच्यावर शेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडे शेगाव नांदुरा असे भुसावळ पॅसेंजर चे तिकिट पोलिसांना सापडले.

By Narendra Puri

Advertisement
Advertisement
Advertisement