Published On : Sat, Apr 17th, 2021

रेमडेसीविरचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरसह इतर तीन वॉर्डबॉय ला अटक

कामठी :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा नागरिकांच्या जीवाशी सर्रास खेळ खेळत असून सर्वत्र मृत्यूचे तांडव पसरले आहे त्यातच कोरोणाबधितांना उपचार दरम्यान दिलासादायक ठरणारी रेमडेसीविर चे इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला असून ही इंजेक्शन सहजासहज मिळत नसल्याने कोविड उपचार घेत असलेलेच्या नातेवाईक सदर इंजेक्शन विकत घेण्यासाठी मोठी रक्कम सुद्धा मोजायला तयार आहेत तरी सुद्धा ही इंजेक्शन मिळत नसल्याच्या चर्चेला उधाण असताच ही इंजेक्शन कामठी शहरातील एका खाजगी रुग्णालय च्या डॉक्टर कडून काळ्या बाजारातून अपेक्षपेक्षा मोठी रक्कम मोजून मिळत असल्याची गुप्त माहितो पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळताच डीसीपी निलोत्पल यांना दिलेल्या आदेशान्वये डीसीपी निलोत्पल च्या पथकाने सापळा रचून काल सायंकाळी सहा वाजेपासून ते रात्री 12 दरम्यान रेमडेसीविर इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या त्या डाक्टर वर धाड घालण्यात यश गाठले असून या धाडीतून डॉक्टर सह इतर तीन वॉर्डबॉय ला अटक करण्यात आली असून अटक आरोपी मध्ये डॉ लोकेश शाहू वय 25 वर्षे रा रविदास नगर कामठी, शुभम मोहदूरे वय 26 वर्षे (वॉर्ड बॉय)जयताळा नागपूर, कुणाल कोवळे नागभूमी नागपूर, सुमित बांगडे वय 26 वर्षे रा वनाडोंगरी नागपूर असे असून यांच्याकडून तीन वेगवेगळ्या कंपनीचो एकूण 15 रेमडेसीविर इंजेक्शन किमती 63 हजार रुपये, रोख रक्कम एक हजार रुपये, दोन मोटार सायकल किमतो 1 लक्ष 10 हजार रुपये, चार मोबाईल किमती 46 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहिती नुसार नागपूर येथील एका परिवाराला रेमडेसीविर इंजेक्शन ची गरज असल्याने त्याने नागपुरात शोध घेऊन ही कुठेही शोध मिळाला नव्हता त्याला मिळलेल्या गुप्त माहिती द्वारे कामठी येथील एका खाजगी डॉक्टर कडे रेमडेसीविर इंजेक्शन मिळत असल्याचे माहिती मिळताच त्यांनी आरोपी डॉ शाहू यांच्याशी संपर्क साधून दोन रेमडेसीविर इंजेक्शन ची मागणी केली त्यावेळी त्यांना 27 हजार रुपये किंमत सांगण्यात आले यानंतर पीडित परिवाराने 20 हजार रुपये ऑनलाईन पेमेंट केले आणि नगदी सात हजार रुपये देऊन इंजेक्शन खरेदी केले.

याची माहितो अन्य व्यक्तीला माहिती मिळताच त्यांनि या व्यवहारा बाबतची पोस्ट सोशल मीडिया वरून जगजाहीर केली .याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी एक फंटर ग्राहक डॉ शाहू कडे पाठवून दोन इंजेक्शन 16 हजार रुपयात खरेदी करण्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी रंगेहात अटक केली.व या कालाबाजारात लिप्त असलेले तीन वार्ड बॉय ला सुद्धा अटक करण्यात आले असून सदर चारही आरोपीना आज कामठी न्यायालयात हजर केले असता पुढील पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


ही यशस्वी कारवाही पोलीस आयुक्त डॉ अमितेशकुमार, डी सी पी निलोत्पल याच्या मार्गदर्शनार्थ डी सी पी पथकाचे एपीआय विजय भिसे, सुरज भारती, दिनेश यादव, चेतन जाधव, रवींद्र राऊत, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे एपीआय कर्नाके,पीएसआय धोंगडे, सुरेंद्र शेंडे तसेच अन्न व औषध प्रशासन नागपूर निरीक्षक स्वाती भरडे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे