Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिकाद्वारे संचालित वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेतील तीन सायकलपटूंची ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान बारामती होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
संजना ठाकूर, पूनम पवार, विशेष शाहू हे तीन खेळाडूंचे नावे आहेत. महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते खेळाडूंना क्रीडा साहित्य देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात आल्या. यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी क्रीडा सभापती प्रमोद चिखले, शिक्षण उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका वर्षा ठाकरे, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवार, वायकुळे उपस्थित होते.
Advertisement