Published On : Mon, Jan 8th, 2018

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात तीन सामंजस्य करार

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या कामाला चालना देण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडको व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेडच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसोबत तीन महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची निवड झाली आहे. या कंपनीबरोबर मिळून सिडको व इतर भागीदार यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली. या कंपनीबरोबर आज सवलत करारनामा, राज्य शासनाचा पाठिंब्याचा करार व भागधारकांचा करार आदी तीन महत्त्वाचे करार करण्यात आले.

Advertisement

यावेळी सिडकोच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीच्या वतीने जीव्हीके कंपनीचे प्रमुख जीव्हीके रेड्डी यांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, मुख्य दक्षता अधिकारी विनय कोरगावकर, जीव्हीकेचे संजय रेड्डी, मुंबई विमानतळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या सर्व परवानगी मिळाल्या आहेत. विमानतळ गाभा क्षेत्रातील भू विकास कामांना सुरूवात झाली आहे. या विमानतळामुळे सुमारे प्रतिवर्ष एक कोटी प्रवासी क्षमतेची व 0.26 दशलक्ष टन मालवाहतूक क्षमता निर्माण होणार असून त्याचा पहिला टप्पा डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची निवड झाली आहे. या कंपनीबरोबर मिळून सिडको व इतर भागीदार यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली. या कंपनीबरोबर आज सवलत करारनामा, राज्य शासनाचा पाठिंब्याचा करार व भागधारकांचा करार आदी तीन महत्त्वाचे करार करण्यात आले. यावेळी सिडकोच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीच्या वतीने जीव्हीके कंपनीचे प्रमुख जीव्हीके रेड्डी यांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, मुख्य दक्षता अधिकारी विनय कोरगावकर, जीव्हीकेचे संजय रेड्डी, मुंबई विमानतळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement