Published On : Sat, Mar 14th, 2020

नागपुरात कोरोनाचे तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह; यवतमाळच्या दोघांचा समावेश; एकूण संख्या ६

नागपूर: कोरोनाचे संशयित म्हणून दाखल झालेल्या तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडून ती आता ६ वर पोहचली आहे. याआधी तीन रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी नव्याने पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या तीन रुग्णांमध्ये एक नागपुरातील रहिवासी आहे तर दोघेजण यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.

शनिवारी हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार कोरोना पिडितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडताना दिसत आहे. शुक्रवारी यवतमाळहून आलेल्या ९ संशयितांचे तर नागपुरातील ४ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी तीन जण पॉझिटिव्ह असल्याचा ताजा अहवाल आला आहे

दरम्यान नागपुरात प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय योजण्यावर कंबर कसली आहे.

याआधी अमेरिकेहून आलेल्या एका गृहस्थांचा अहवाल सर्वात प्रथम पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची पत्नी व नातेवाईक हे दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.