Published On : Thu, Oct 3rd, 2019

बीकेसीपी शाळेच्या मंगर ला तीन सुवर्ण व भोस्कर ला कास्य पदक

कन्हान : – विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर, नागपूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम प्रांत स्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत बीकेसीपी शाळेच्या सानिका मंगरनी तीन सुवर्ण व भुमिका भोस्करनी कास्य पदक पटकावित १७ वर्ष वयोगट मुलींत उत्कृष्ट खेळुन यश संपादन केले.

विभागीय क्रीडा संकुल मानकापुर, नागपूर येथे संपन्न झालेल्या विद्या भारती पश्चिम प्रांत स्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील बीकेसी पी शाळा कन्हानच्या खेळाडूंनी १७ वर्ष वयोगट मुलींमध्ये १००, २०० मी. दौड (धावनी), लांबउडी मध्ये सानिका अनिल मंगर हीने प्रथम क्रमांकाचे तीन सुवर्ण पदक पटकावित राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. तसेच ८०० मी दौड (धावनी) भुमिका भोस्कर हिने कास्य पदक पटकाविले.

राजस्थान येथील गाणोर येथे १८ ऑक्टोबर पासुन सुरू होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत बीकेसीपी कन्हान ची खेडाळु सानिका अनिल मंगर ही पश्चिम प्रांताचे प्रतिनिधीत्व करणार असल्याने तालुक्याचे व शाळेचे नाव लौकिक करित असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजीव खंडेलवाल, सचिव गेरोला मॅडम, मुख्याध्यापीका कविता नाथ, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर व सर्व शिक्षकांनी खेडाळुचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.