Published On : Thu, Oct 3rd, 2019

कन्हान व परिसरात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जंयती साजरी

कन्हान : – परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, स्वराज संस्था, राजकीय पक्ष, संस्था, संघटना व्दारे विविध कार्यक्रमा सह महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

शहर युवा सामाजिक कार्यकर्ता
कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व्दारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती लालबहादुर शास्त्री जयंती चा कार्यक्रम गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ता अमोल साकोरे हस्ते पुष्पहार अर्पण करून ऋृषभ बावनकर हयानी महापुरुषाच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे संचालन चंदन मेश्राम यांनी तर आभार हरीओम प्रकाश नारायण यांनी व्यकत केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता सोनु खोब्रागडे, मुकेश गंगराज , अक्षय फुले, प्रकाश कुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.

कन्हान कॉंग्रेस कमेटी व युवक काँग्रेस
गांधी चौक कन्हान येथे राष्ट्रपिता, सत्य,अहिसेचे पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती कन्हान काँग्रेस व युवक काँग्रेस व्दारे हर्षोउल्हास साजरी करण्यात आली. याप्रसंगी नरेश बर्वे, दयाराम भोयर, राजेश यादव, गणेश माहोरे, चॉंद भाई, रेखा टोहणे, सतीश भसारकर, युवक कांग्रेस चे राजा यादव, आकिब सिद्दिकी, मोहसीन खान, मनीष भिवगडे, अमोल प्रसाद, शक्ति पात्रे, बाबू रंगारी, दिनेश नारनवरे, प्रमोद वानखेडे आदी सह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी दिला भारत स्वच्छतेचा संदेश
कोळशा खदान जि.प.उच्च प्राथमिक शाळेत महात्मा गांधीजींची १५० वी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.


सर्व प्रथम गांधीजी व शास्त्रीजी यांचे प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. गांधीजींनी अहिंसा व असहकार चळवळीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य कशाप्रकारे मिळून दिले, या विषयावर पदवीधर अध्यापक प्रेमचंद राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लाल बहादूर शास्त्री यांच्या देश हितार्थ कार्यावर प्रकाश टाकला. तद्नंतर सहायक शिक्षिका रिदवाना शेख यांनी विद्यार्थी व उपस्थितांना तंबाखू मुक्ती,प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छते विषयी शपथ दिली.

देशाच्या पंतप्रधानां नी संपूर्ण भारतभर राबवित असलेल्या “स्वच्छ भारत अभियान” ला अधिक बळकटी मिळावी म्हणुन विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढुन जनजागृती केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळे च्या मुख्याध्यापिका शुभांगी चंदनखेडे, शिक्षक अभिषेक कांडलकर, मधुमती नायडू , रेहाना शेख, सारिका वरठी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.