Published On : Thu, Apr 9th, 2020

भिलगाव च्या पोल्ट्री फॉर्म मधून तीन बकऱ्या चोरीला

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भिलगाव मार्गावरील धोंडबाजी ठाकरे यांच्या शेतातील पोल्ट्री फॉर्म मधून अज्ञात चोरट्याने गतरात्री तीन बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी तन्वीर अहमद कुरेशी वय 22 वर्षे रा भूषण नगर येरखेडा कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 380, 457 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढोल तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी