Published On : Thu, Apr 9th, 2020

विद्दुत शॉक लागलेल्या तरुणाचा मृत्यू

कामठी : कळमना मार्गावरील एका फेब्रिकेशन वर्कशॉपमध्ये काम करीत असताना उच्च दाबाच्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात 8 एप्रिला मध्यरात्री निधन झाले असून मृतक तरुणाचे नाव मोहम्मद शाहबाज अहमद इर्शाद वय 24 वर्षे रा वारीसपुरा कामठी असे आहे.यासंदर्भात नवीन कामठी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक कामठी कळमना मार्गावरील टाइल्स दुकाना बाजूला असलेल्या फॅब्रिकेशन वर्कशॉप मध्ये काम करीत असताना 19 मार्च ला सायंकाळी 5 वाजता सुमारास उच्च दाबाच्या विद्युत प्रवाह तारेचा स्पर्श होऊन लागलेल्या करंटमुळे तरुण गंभीर झाला त्याला उपचारासाठी कामठी कळमना मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते उपचार सुरू असताना 8 एप्रिल चे मध्यरात्री त्याचे निधन झाले निधन झाल्याची घटना मृतकाच्या नातेवाईकांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर पांडे यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन पंचनामा करून प्रेत पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू आहे. मृतकाच्या पाठीमागे आई ,एक भाऊ व चार बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे घरचा कर्तबदार तरुणांचा अपघाती निधन झाल्याबद्दल वारीसपुरा परिसरात नागरीक हळहळ करीत होते

संदीप कांबळे कामठो