कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन सज्ज असून सध्यस्थीतीत कामठी शहर कोरोना मुक्त ठरला असला तरी कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बधितांची आकडेवारी वाढीवर आहे यानुसार आज कामठी शहराला लागून असलेल्या खैरी गावातील ऍफकॉन इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड नामक कंपनीत दिल्ली रिटर्न आलेले तीन मजूर हे कोरोणाबधित आढळल्याची घटना सकाळी 10 दरम्यान निदर्शनास आली यानुसार या तीनही कोरोना पोजिटिव्ह रुग्णांना नागपूर च्या मेयो इस्पितळातील विलीगिकरण कक्षात हलविण्यात आले यानुसार सध्यस्थीतीत कामठी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही एकूण 16 झाली असून यातील 10 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले तर उर्वरित सहा जण शासकीय विलीगिकरण कक्षात उपचार घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार खैरी गावातील एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नामक कंपनीत 3 मजूर हे दिल्लीहून 14 जून ला आले होते तेव्हा कंपणीच्या वतीने यांना कंपनीच्या आयसोलेशन कक्षात सुरक्षित ठेवण्यात आले होते तसेच यांची खाजगी इस्पितळातून स्वेब चे नमुने ची तपासणी सुद्धा करून घेतली या तपासणी अहवालात हे तीन मजूर कोरोणाबधित झाल्याचे लक्षात येताच तहसिलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर व आरोग्य पथकानी त्वरित या कंपनीला भेट देत सदर तिन्ही रुग्णांना मेयो इस्पितळातील शासकीय विलीगिकरन कक्षात हलविण्यात आले. हे तिन्ही कोरोना पॉजिटिव्ह क्रमशः 47, 42, 28 वयाचे असल्याचे सांगण्यात येत असून यांच्या संपर्कात आलेल्या 7 संशयितांना व्हिएन आयटी च्या विलीगिकरण कक्षात हलविण्यात आले आहे.
बॉक्स:-कामठी शहर सध्या कोरोनामुक्त झाला असला तरी कामठी तालुक्यातील महादुला, नांदा, व आता खैरी गावात कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण 16 कोरोनाबधित रुग्णापैकी 10 रुग्ण बरे झाले असून फक्त 6 रुग्ण कोरोनाबधित ठरले आहेत तसेच गृह विलीगिकरण असलेल्याची शहरातील संख्या 54 तर ग्रामीण ची संख्या 183 आहे तसेच शासकीय विलिगिकरण कक्षात दाखल असलेल्यांची संख्या ही 10 आहे
संदीप कांबळे कामठी
