Published On : Sat, Jun 20th, 2020

राहुल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त रामटेक येथे कोरोना योद्द्यांचा सत्कार

माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा स्तुत्य उपक्रम। रामटेक(शहर प्रतिनिधी)काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त रामटेक येथे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते कोरोना योध्यानचा सत्कार करण्यात आला.कोरोना योद्द्यांचा गौरव म्हणून रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के,मुख्याधिकारी स्वरूप खरगे,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ प्रकाश उजगरे व सहकाऱ्यांचा शाल,श्रीफळ,मास्क व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.रामटेक शहर व सम्पूर्ण तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेने व सर्वांनी मिळून केलेल्या अविरत प्रयत्नामुळे एकही कोरोनाबाधित रुग्ण मिळाला नाही हे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे यश आहे.यावेळी उपस्थित सर्वांनी चीनच्या सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी कांग्रेसचे जिल्हा महासचिव उदयसिंग यादव,जीप सदस्य कैलास राऊत,शांताताई कुमरे, नरेश बर्वे,दयाराम भोयर,नगरसेवक दामोदर धोपटे,कलाताई ठाकरे,असलम शेख,मीनाताई ठाकरे,इस्माईल शेख,करुणा भोवते,संदीप भलावी,भुमेश्वरी कुंभलकर, मंगला निंबोने,रवी कुमरे,शंकर होलगिरे,पिंकी राहाटे,स्वप्नील श्रावनकर, लक्ष्मण उमाळे,पी टी रघुवंशी,शेषराव देशमुख, योगेंद्र रंगारी,प्रफुल कावळे,रेखा टोहणे, बंटी निंबोने,अफजल हुसेन चांद,प्रशांत कामडी,आशिष भड, मुन्ना बोतरा, लता लुंढोरे,आकीब सिद्दीकी, मेघराज लुंढोरे,राहुल कोठेकर, अनुप सावरकर,वशीम कुरेशी,रवी चवरे,दीपक मोहोड,प्रदीप बावने, युवराज थोटे व इतर अनेक कांग्रेस नेते सोशल डिस्टनिंगचे पालन करून व मास्क लावून उपस्थित होते.