Published On : Thu, Aug 8th, 2019

सात्विक, सोज्वळ सुषमाजींना विनम्र श्रध्दान्जली

Advertisement

रामटेक : सुषमा स्वराज यांचं अकस्मात निधन मनाला चटका लावून जाणारं आहे, त्यांची ओघवती वाणी, त्यांचं व्यक्तिमत्व, सामाजिक जीवनात एखाद्या स्त्री ने कसे असावे, त्यांचा पेहेराव, त्यांचं राहणीमान, त्यांची देहबोलीतून नेहमी माया, ममता आणि मातृत्व झळकत असे.

त्यांचे वक्तृत अनुभवणे म्हणजे एक समृद्ध करणारा अनुभव होता. त्यांचं संसदेतील भाषण असो, संस्कृत मधील भाषण असो, की युनो मध्ये मांडलेली भारताची भूमिका असो कायम स्मरणात राहतील आणि चर्चेत राहतील अशी भाषणे देण्याची हातोटी आणि शैली जपणाऱ्या नेत्या आज आपल्यातून निघून। गेल्या असल्याचे शोकसंवेदना आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी व्यक्त केल्या .

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ महिला नेत्या यांचा हृदयविकाराने स्वर्गवास झाला त्यानिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रम आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मनसर येथील कार्यालयामध्ये तसेच रामटेक किराड भवन येथे आयोजित केला होता .

ह्यावेळी नगराध्यक्ष दिलीप देशमुख ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले ,राजेश ठाकरे , भाजपाचे मौदा उपाध्यक्ष कैलास बरबटे ,सरपंच आनंद लेंडे ,नगर परिषद उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे, , नगरसेवक प्रभाकर खेडकर , रामानन्द अडामे , नगरसेविका वनमाला चौरागडे , कविता मुलमुले , लता कामडे ,चित्रा धूरई श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता म्हणून भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement