Published On : Wed, Jun 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

RSS मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपूर, पुणे, मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क

Advertisement

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्या नागपूरातील रेशीमबाग येथील मुख्यालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने नागपूरसह पुणे आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत ई-मेलवर आलेल्या धमकीच्या संदेशात नागपूरमधील संघ मुख्यालयासह पुणे आणि मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना आयईडी बॉम्बने लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे महानगरपालिकेला हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये पुणे महापौर कार्यालयात दुपारी १.११ वाजता, तर पुणे विधान भवन आणि नागपूरातील रेशीमबाग येथील RSS मुख्यालयात दुपारी ३.११ वाजता स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय, १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागपूर आणि पुण्यातील संघाच्या विविध शाखांनाही लक्ष्य केले जाईल, असा दावा ई-मेलमध्ये करण्यात आला होता. या धमकीनंतर नागपूर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच सायबर विभाग तात्काळ सतर्क झाला.

पोलीसांनी रेशीमबाग येथील संघ मुख्यालय, हरिहर मंदिर आणि स्मृती भवन परिसरात व्यापक शोधमोहीम राबवली. सुमारे दोन तास चाललेल्या तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

नागपूर पोलीसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर पथक कार्यरत आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.