Advertisement
नागपूर : नागपूरच्या सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे न्यायालय उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या आहेत.
धमकीचा ई-मेल समोर येताच खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्बशोधक व नाशक पथकाला न्यायालय परिसरात पाचारण करण्यात आले. पथकाकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू असून, प्रत्येक ठिकाणाची बारकाईने पाहणी केली जात आहे. संशयास्पद वस्तू आणि संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला आणि त्यामागील उद्देश काय, याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, तपासणी मोहीम सुरू आहे.




