Published On : Fri, Jun 5th, 2020

‘त्या’ युवकांनी दोन महिने गरिबांना पुरविले भोजन

नागपूर : संपूर्ण देशात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे गरिबांच्या हाताचे काम गेले. हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली. झुग्गी झोपड्यात राहणाºया नागरिकांच्या मदतीला पालकमंत्री व ऊर्जामंत्री यांची सामाजिक संस्था ‘संकल्प’ धावून आली. त्यांनी दररोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था केली. उत्तर नागपुरातील प्रत्येक गोर-गरीब व गरजूच्या घरापर्यंत भोजन पोहोचविण्यात आले.

या कामात सिद्धार्थनगर टेका येथील सामाजिक कार्यकर्ता सुमित चव्हाण याने व त्याच्या चमूने मोलाचे कार्य केले. तब्बल दोन महिने या युवकांनी मेहनत घेत टेका, सिद्धार्थनगर, नई-बस्ती या भागातील गरिबांच्या दारापर्यंत जेवणाचे पॉकीट पोहोचते केले.

सकाळ-सायंकाळ दोन्ही वेळेला एकही गरीब उपाशी झोपू नये, याची या युवकांनी खबरदारी घेत परिश्रम घेतले. लघुवेतन कॉलनी येथील ललित कला भवन येथे ‘संकल्प’ने तयार केलेले भोजन परिसरातील मजूर, गरीब, गरजूंच्या घरी पोहोचविण्याचे मोलाचे काम या युवकांनी केले. मानवसेवेच्या याकामात सामाजिक कार्यकर्ता सुमित चव्हाण, जितेंद्र (वात्या)डोंगरे, मधूर गजभिये, जीवक मेश्राम, विजय धमगाये, मन गजभिये, रक्षक गजभिये आदींनी सहकार्य केले.