Advertisement
नागपूर : भारतीयांना यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण येत्या ५ मे राेजी बुद्ध पाैर्णिमेच्या दिवशी पाहता येणार आहे. हे ग्रहण पेनम्ब्रल असेल म्हणजे ग्रहणातही चंद्राच्या तेजस्वीतेत कोणताच परिणाम पडणार नाही. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच दिसत असून अनेक भागात हे वेगवेगळ्या वेळी पाहायला मिळतो.
भारतातून साधारणत: रात्री ८:४४ वाजल्यापासून ग्रहण पाहता येईल. रात्री १०:३० पासून ग्रहण वाढलेले असेल आणि रात्री १०:५२ वाजता सर्वाधिक झाकलेला असेल. रात्री १ वाजता ग्रहण संपेल. भारतातून ४ तास १८ मिनिटे हे ग्रहण चालेल. हे ग्रहण उघड्या डाेळ्यांनीही पाहता येणार असून त्याचे कोणतेच दुष्परिणाम होणार नाही.