मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती होत असल्याचे जाहीर केले. पवारांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शरद पवारांच्या निर्णयाच्या पाठिशी असल्याचे त्यांच्या विधानातून दिसून आले.
शरद पवारांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पवारांच्या या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितले.तुम्ही एक गैरसमज निर्माण करत आहेत. आज काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत पण सोनिया गांधींकडे पाहून पक्ष चालला आहे. हे पाहता शरद पवारांच्या आजच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देणार आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.