Published On : Fri, Jun 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार;राजनाथ सिंह यांचे नागपुरातून मोठे विधान

Advertisement

नागपूर : भारताच्या संरक्षण क्षेत्राला अधिक सक्षम, स्वयंपूर्ण आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याच्या दिशेने नागपुरात मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. अंबाझरी आयुध निर्माणी येथे १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी हा प्रकल्प देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमतेत ऐतिहासिक भर घालणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

राजनाथ सिंह म्हणाले की, भविष्यातील युद्ध आणि सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर देशाचे स्वतःचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पामुळे क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, अंतराळ मोहिमा, रेल्वे आणि इतर सामरिक क्षेत्रांसाठी लागणारे अत्याधुनिक अॅल्युमिनियम घटक देशातच तयार होणार आहेत. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन भारताच्या आत्मनिर्भरतेला नवे बळ मिळेल.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत स्वदेशी क्षमतेवर भर-
संरक्षणमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना सांगितले की, आधुनिक संरक्षण उपकरणांच्या निर्मितीत स्वदेशी तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मोठ्या संरक्षण यंत्रणांची ताकद हजारो छोट्या-मोठ्या घटकांमध्ये दडलेली असते. या प्रकल्पामुळे अशा अत्यावश्यक घटकांचे उत्पादन देशातच होणार असून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची गती आणखी वाढेल.

Advertisement

संरक्षण उत्पादनात भारताची झेप-
देशातील संरक्षण उत्पादनाचा आकडा २०१४ मधील ४६ हजार कोटी रुपयांवरून २०२५-२६ मध्ये १.७८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. संरक्षण निर्यातही १ हजार कोटी रुपयांवरून ३८ हजार ४२४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात ३ लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि ५० हजार कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दिष्ट वेळेपूर्वीच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


नागपूर संरक्षण उत्पादनाचे नवे हब : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा आहे. नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहेत. या प्रकल्पामुळे रोजगार, गुंतवणूक आणि अत्याधुनिक उद्योगांना चालना मिळणार असून नागपूर देशाच्या ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे.

अंबाझरी आयुध निर्माणीतील हा प्रकल्प केवळ एक औद्योगिक गुंतवणूक नसून भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges